
पारगाव - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालु हंगामात गाळप केलेल्या ऊसाला 3100 रुपये एफआरपी नुसार दर देणार असुन, त्यापैकी 2800 रुपये आत्ता देणार, उर्वरित 300 रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर एक महिन्याच्या आता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहीती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.