
मंचर : भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र धार्मिक स्थळ असून, देशभरातून दररोज हजारो भाविक येथे येतात. मात्र, भाविकांना अनेक तास रांगेत उभं राहावं लागणं, पार्किंगसह अन्य सुविधांचा अभाव, अवैध धंदे आणि गुन्हेगारी या समस्यांनी त्यांची गैरसोय होत होती.या पार्श्वभूमीवर, श्रावण महिन्यापासून भीमाशंकर येथे ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्रीक्षेत्र शिर्डी प्रमाणे १५–२० मिनिटांत दर्शन मिळेल, पार्किंगची चांगली व्यवस्था आणि भाविकांसाठी सुलभ सेवा उभारण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले सादरीकरण कौतुकास्पद आहे.” असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.