भीमाशंकर कारखान्याची मुख्यमंत्री साहय्यता निधीस दहा लाखांची मदत

सुदाम बिडकर
Monday, 12 October 2020

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत दहा लाख रुपयांची मदत मुखमंत्री साहय्यता निधीस देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील 
 भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कोरोना आजाराचे पार्शभूमीवर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाने घेतेलेल्या निर्णयानुसार दहा लाख रुपयांची मदत मुखमंत्री साहय्यता निधीस देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड १९ या आजाराने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे राज्यात व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने व राज्याचे तिजोरीवर आर्थिक भार आल्याने मुख्यमंत्री यांनी मुखमंत्री साहय्यता निधीस मदत करण्याकरिता केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्यात आला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारखान्याच्या वतीने वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांचे हस्ते जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडेलकर यांचेकडे दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimashankar factory donates Rs 10 lakh to CM assistance fund