Bhimashankar Development : भीमाशंकरच्या विकास आराखड्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक
Government Projects : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भीमाशंकरच्या २८८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, कुंभमेळ्यापूर्वी काम सुरू होणार आहे.
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केल्या.