Pargaon News : भीमाशंकर कारखान्याची AI शेती योजना; ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांचे तंत्रज्ञान अनुदान

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व भीमाशंकर कारखान्याचा संयुक्त उपक्रम; ३ हजार शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा लाभ
Bhimashankar Cooperative Sugar Factory and Vasantdada Sugar Institute have launched an AI-powered sugarcane farming initiative, offering technology support worth ₹25,000 per farmer to boost productivity and reduce cultivation costs.

Sakal

Updated on

पारगाव : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि ऊस उत्पादनात भरीव वाढ व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रति शेतकरी सुमारे २५ हजार रुपयांचा खर्च वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संयुक्तपणे उचलणार आहे. ही योजना एकूण तीन हजार शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com