पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज (नवी दिल्ली) यांचा सन २०२३-२४ करीता देशातील 'वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारला.