Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील 'वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार' जाहीर

'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार' आठ वेळा मिळविणारा देशातील भीमाशंकर एकमेव साखर कारखाना
Dilip Walse Patil, Balasaheb Bende and Pradip Walse Patil

Dilip Walse Patil, Balasaheb Bende and Pradip Walse Patil

sakal

Updated on

पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.( नवी दिल्ली) यांचा सन २०२४-२५ करीता 'देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार' जाहीर झाला आहे. देशातील २०२४-२५ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com