

Allegations of Devotee Exploitation at Bhimashankar Temple
Sakal
घोडेगाव : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत येथील सुरक्षारक्षक, एजंट व समितीतील व्यक्ति भाविकांकडून हजारो रूपये घेत दर्शन देत आहे. भाविक अभिषेक करण्यासाठी आला असता वाटेल तो अभिषेकाचा दर घेतला जातो. हे देवस्थान कुंभमेळ्यापूर्वी शासनाने ताब्यात घ्यावे अशी लेखी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर यांनी राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.