Bhimashankar Temple
sakal
भीमाशंकर : श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी पहाटे ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गर्दीचे नियोजन, वाहतूक आणि सुरक्षेबाबत विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.