

Bhimashankar temple darshan booking
esakal
Mandatory online registration?
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून पुन्हा खुले करण्यात आले आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन नोंदणी व पास घेणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, गुरुवारपासून (ता. १८) दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना ऑनलाइन नोंदणी किंवा पास न घेताच थेट दर्शन मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.