

Bhimthadi Jatra Set to Return in a New Avatar
Sakal
पुणे : ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी ‘भीमथडी जत्रा’ पुणेकरांना यंदा नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. ‘भारतातील स्थानिक फुलं’ ही यंदाची थीम असल्याने ‘भीमथडी’च्या माध्यमातून देशातील स्थानिक वनस्पतींचे जतन केले जाणार आहे. ‘अॅग्रीकल्बरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’, ‘भीमथडी फाउंडेशन व ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी’ यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ही यात्रा २० ते २५ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात पार पडणार आहे, अशी माहिती जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांनी सोमवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.