पुण्यातील भीमथडी जत्रेला सुरवात

पुण्यातील यंदाच्या भीमथडी जत्रेला बुधवारपासून (ता.२२) सुरवात झाली. येत्या २६ डिसेंबरपर्यंत ही जत्रा चालणार आहे.
Bhimthadi Jatra
Bhimthadi JatraSakal
Summary

पुण्यातील यंदाच्या भीमथडी जत्रेला बुधवारपासून (ता.२२) सुरवात झाली. येत्या २६ डिसेंबरपर्यंत ही जत्रा चालणार आहे.

पुणे - पुण्यातील यंदाच्या भीमथडी जत्रेला (Bhimthadi Jatra) बुधवारपासून (ता. २२) सुरवात झाली. येत्या २६ डिसेंबरपर्यंत ही जत्रा चालणार आहे. राज्यातील पंधरा उद्योजिकांच्या हस्ते अगदी साधेपणाने या जत्रेचे उदघाटन करण्यात आले. ही जत्रा सकाळी १० ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या जत्रेत पुणेकरांना सेंद्रिय उत्पादने, विविध वस्तु, कडधान्य आणि खाद्यपदार्थ खरेदीची संधी मिळणार आहे.

बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर (सिंचननगर) येथे ही यात्रा भरली आहे. राज्यातील मनीषा भिरूड (जळगाव), अश्विनी कांबळे (मुंबई), शीतल पिसाळ (सातारा), सीमा यादव (पुणे), सुरेखा देवकर (सोलापूर), स्वप्नाली पाटील (सांगली), सुवर्णा देशमुख (कोल्हापूर), विजया पवार (बीड), कोमल काळे (सिंधुदुर्ग), दीपिका देशमुख (अकोला), अंबिका शिंदे, वंदना चौधरी ,शारदा बच्छाव व मालन खोडवे, कुंदा गुळवे (सर्व नगर) या उद्योजिकांच्या हस्ते या जत्रेचे उदघाटन करण्यात आले.

Bhimthadi Jatra
पुणे : मुख्यसभेनंतर हजेरी लावण्यासाठी नगरसेवकाची दादागिरी

यावेळी सुनेत्रा पवार, आयोजिका सुनंदा पवार, रजनी इंदुलकर, लीना देशपांडे, सरोज पाटील, मीनाताई जगधने, निकोला पवार, राजेंद्र पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, सई पवार, सारस्वत बँक प्रतिनिधी वृषाली दिवाडकर, महाराष्ट्र बँक प्रतिनिधी संतोष गदादे आदी उपस्थित होते.

यंदाची भीमथडी जत्रा ही समृद्ध ग्रामीण विकास या संकल्पनेवर आधारित आहे. व्हर्टिकल गार्डन, बिनमातीची शेती, सेंद्रिय उत्पादने, गाव तेथे देवराई हे यंदाच्या भीमथडी जत्रेचे वेगळेपण आहे. या देवराईत एकूण ५१५ झाडे असून त्यात ९६ प्रकारची देशी झाडे, १३ प्रकारची वेलवर्गीय झाडे, ११ प्रकारची झुडपे आणि गवताचे २ प्रकार आहेत. शिवाय लुप्त होत चाललेल्या लोककला, वाघ्या मुरळी, नंदिवाले आदी विविध अंगाने नटलेली ही भीमथडी पुणेकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास सुनंदा पवार यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com