Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Mob Attacks Solar Power Project Site in Bhor: भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित सोलर वीज उपकेंद्र प्रकल्पावर मध्यरात्री अज्ञात जमावाने हल्ला करून मशिनरी, वाहने आणि कार्यालयाची जाळपोळ केल्याचा प्रकार घडला.
Bhor Solar Machinery Vandalism

Bhor Solar Machinery Vandalism

esakal

Updated on

किरण भदे

नसरापूर: भोंगवली ता. भोर येथे चालू असलेल्या सोलर विज उपकेंद्र कामावर एक ऑगस्ट रोजी पहाटे एक ते दीड वाजले सुमारास मोठ्या जमावाने हल्ला करत कामावरील कंपनीच्या मशिनरी वाहने जनरेटर इत्यादी साहित्यांची जाळपोळ करत तेथील निवासी कामगारांना त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत फोडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अज्ञात जमावावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com