
Bhor Accident
Sakal
हिर्डोशी : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता.भोर) हद्दीत रस्त्यावरील मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कारचा अपघात झाल्याची घटना रविवारी (ता.२९) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे.