

Pune Bhor Child CCTV Video
esakal
Pune minor girl CCTV video : पुण्यातील भोर तालुक्याच्या नसरापूर गावातील ४ वर्षांच्या मुलीवर एका नराधम विकृत माणसाने अत्याचार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ही मुलगी नसरापूरला सुट्टीनिमित्त गेली होती. दुपारच्या वेळेत राममंदिर परिसरात खेळत असताना तिला आमिष दाखवून जवळच्या गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार करुन खून केला. एक व्यक्ती त्या लहान चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.