भोर - शहरासह तालुक्यातील ११८ गावांसाठी भोर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची संख्या केवळ २९ असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांवर कामाचा ताण येत आहे. पोलिसांची ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे गुन्ह्यांचा तपास संथगतीने सुरु असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस हतबल होताना दिसत आहेत. त्यामुळे भोरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ड्युटीवरील पोलिसांना नियमापेक्षा अधिक वेळ काम करावे लागत आहे. मात्र यामुळे पोलिसांची मानसिकतेत बदल होत आहेत.