esakal | Bhor: तरूणाच्या खूनातील 3 आरोपींना 24 तासात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

भोर : तरूणाच्या खूनातील 3 आरोपींना 24 तासात अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोर (पुणे) : कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाचा खून करणा-या चार आरोपींपैकी तींघांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने पकडले. तीनही आरोपी बँगलोरला पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली, त्यांना भोर पोलिसांनीही सहकार्य केले. सनी सुरेश बारंगळे (रा. सम्राट चौक भोर), अमिर मंहम्मद मणेर, समीर मंहम्मद मणेर (दोघेही रा. नवी आळी भोर) या तीघांना पोलिसांनी पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ येथील पुलाखाली रविवारी (ता.3) रात्री अकरा वाजता अटक केली. तीघेही बँगलोरला पळून जाण्याच्या तयारीत होते. शहरातील सम्राट चौकात शनिवारी (ता.2) रात्री साडेअकराच्या सुमारास आनंद गणेश सागऴे (वय. 23) यास तीन्ही आरोपींना चौथा आरोपी सिद्धांत संजय बोरकर (रा. स्टेट बँके जवळ भोर) याच्यासमवेत आनंद सागळे यास दगडाने ठेचून ठार केले. त्यानंतर चौघेही आरोपी फरार झाले होते. मयत आनंद याची आई वर्षा गणेश सागळे यांनी याबाबत भोर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानीक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खब-यांमार्फत पुणे-सातारा महामार्गावर सापळा रचला आणि तीघांनाही पळून जाण्यापूर्वीच पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली

पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे

, पोलिस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, पूनम गूंड

यांनी ही कामगीरी केली. तीन्ही आरोपींना भोर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले. सोमवारी (ता.4) आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.

फोटो पाठविला आहे

loading image
go to top