esakal | Pune : वरंधा घाटातील अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

bhor accident

Pune : वरंधा घाटातील अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी

sakal_logo
By
विजय जाधव ः सकाळ वृत्तसेवा

भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाडच्या बाजूला वरंध गावाजवळील नागमोड्या वळणावर ट्रकची पीकअप जीपला धडक बसून झालेल्या अपघातात 6 वर्षाच्या लहान मुलीसह तीघेजण गंभीर जखमी झाले. बुधवारी (ता.13) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दिवसभरात 2,219 रुग्णांची नोंद

वरंध गावच्या ग्रामस्थांनी गाड्यांमध्ये अडकलेल्या तिघांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. गंभीर जखमी झालेले तिघेही भोरचे आहेत. जखमींना महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहेत. वरंध ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक पीकअक जीप महाडवरून भोरला येत होती. त्यावेळी वरंध गावाजवळील नागमोडी वळणावर भोर बाजूकडून आलेला ट्रक (क्रमांक एम एच 12 एफ सी 8199) हा वंरधा घाटतून महाडच्या बाजूला घाट उतरत होता.

हेही वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

ट्रकने समोरून जीपला धडक दिल्याने दोन्हीही वाहने खोल दरीत कोसळली. अपघाताचा आवाज आल्याने वरंध गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पीकअप जीपमधील चालक आणि त्याची 6 वर्षांची मुलगी व ट्रकचालक या तीघांनाही ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. सर्व जखमींना महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. तीनही जखमींची नावे समजू शकली नाहीत.

loading image
go to top