भोर वेल्हा नेतृत्वाला आता जास्त वनवास भोगायची गरज नाही : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर वेल्हा नेतृत्वाला आता जास्त वनवास भोगायची गरज नाही : नाना पटोले

भोर वेल्हा नेतृत्वाला आता जास्त वनवास भोगायची गरज नाही : नाना पटोले

पुणे (नसरापूर) : भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांच्या परिक्षेचा काळ संपला असुन त्यांना आता वनवास भोगायची गरज नाही असे मत व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संग्राम थोपटे यांना राज्यात नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत दिले आहेत.

भोर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर उपबाजारा मधील व्यापारी संकुलाचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झाले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप,आमदार संग्राम थोपटे, आमदार श्रीरामहरी रुपनवर,विशाल पाटील,देविदास भन्साळी,श्रीरंग चव्हाण,उत्कर्षाताई रुपवते,दादुशेठ खान,महिला अध्यक्षा सिमा सावंत,संजय बालगुडे,संभाजी कुंजीर,कृष्णाजी शिनगारे,संतोष साखरे,शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, भोर बाजार समितीचे सभापती अंकुश खंडाळे,उपसभापती सोमनाथ निगडे,संचालक ज्ञानोबा दानवले,संपत आंबवले,लक्ष्मण पारठे,राज तनपुरे,ईश्वरलाल खोपडे,संदिप चक्के,शिवाजी पाटणे,मिलिंद आवाळे,अंकुश मोरे,लक्ष्मण काळे,सुभाष धुमाळ,सोनाबाई मांढरे,सुरेश गिरे,मंगल बांदल, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

पटोले बोलताना पुढे म्हणाले हा भाग बारामती मतदार संघातील असल्याने याभागाचा सर्वांगिण विकास झाला असेल अशी माझी कल्पना होती परंतु अजुनही विकास बाकी आहे येथे कामात अडचणी जाणवत आहेत असे येथील आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले परंतु तो वनवास आता संपेल,काँग्रेसने शेतकरी व कामगार यांना केंद्रबिंदु मानुन विकास केला आहे संग्राम थोपटे यांनी सांगितलेल्या सर्व अडचणी आम्ही सोडवु व पुढील काळात अशी ताकद देऊ कि त्या ताकदीच्या भरवशावर तुमच्या सर्वांचा विकास करण्याची संकल्पना राबवली जाईल.

आमदार संग्राम थोपटे यांनी बोलताना शेतकरयांना केंद्रबिंदु मानुन या उपबाजारात व्यापारी संकुल उभे राहीले आहे येथे शेतकरयांचा बागायती शेतमाल यावा यासाठी गुंजवणी प्रकल्पा मधुन वाजेघर,वांगणी व शिवगंगा खोरे साठी पाणी उपसा योजना मंजुर केल्या आहेत त्या माध्यमातुन या भागात बागायती वाढणार आहे व बागायती मालास या ठिकाणी बाजारपेठ मिळणार आहे अशा चाललेल्या विकासाला काही विरोधक श्रेयासाठी धडपड करत टिका करत आहे परंतु हे येथील मावळा कदापी सहन करणार नाही जे आम्हाला कमी लेखत आहेत त्यांना येथील मावळ्यांनी त्यांची जागा दाखवली आहे व या पुढे देखिल दाखवेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे संचालक राजु शेटे यांनी केले तर अभार मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर यांनी मानले.

loading image
go to top