Video : उजनीत भोरड्यांच्या मनमोहक कवायती

सचिन लोंढे
Tuesday, 14 January 2020

काही नौकाचालक पर्यटक व पक्षी अभ्यासकांना भोरड्या पाहण्यासाठी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेत असतात. पर्यटकांनी केवळ त्यांचे निरीक्षण नोंदवून नेत्रसुख घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, अनेकदा नौकाचालक या भोरड्यांना हुसकावून त्यांची छायाचित्रे काढतात. वास्तविक त्यांच्या वास्तव्यात अडथळा आणणे योग्य नाही. त्यामुळे वन विभागाने पक्षी वसाहत असलेल्या अशा झाडांजवळ जाण्याची मर्यादा नौकाचालकांना ठरवून देणे गरजेचे आहे.
 - ॲड. महेश कन्हेरकर, अध्यक्ष, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था

कळस - युरोपातून सुमारे पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशय परिसरात आलेल्या आलेले भोरड्या पक्ष्यांची सायंकाळच्या वेळी आकाशात चालणारी मनमोहक कवायत पाहण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह ग्रामस्थ गर्दी करत आहेत.

इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, मदनवाडी, भादलवाडी, कुंभारगाव परिसरात या भोरड्यांचा सायंकाळी मुक्काम असतो. लाखोंच्या संख्येने असलेल्या भोरड्यांचे मावळतीच्या प्रकाशात कवायत करतानाचे दृश्‍य नयनरम्य असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून भोरड्या हजेरी लावत आहेत. पाण्यातील झाडे, काटेरी झाडे, वड व पिंपळासारख्या मोठ्या झाडांवर त्यांचा रात्रीचा मुक्काम असतो.

निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी

मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्याअगोदर ते उथळ पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करतात. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी आकाशात त्यांची कवायत चालते. कवायतीदरम्यान भोरड्यांचे अनेक छोटे-मोठे थवे सहभागी होतात. रात्रीचा मुक्काम संपला की सकाळी खाद्यान्नाच्या शोधात ते आपल्या सोईनुसार छोट्या-छोट्या थव्यात विभागणी करून निघून जातात. ज्वारी, कीटक, छोटी फळे हे त्यांचे खाद्य आहे. या पक्ष्यांकडून बीज प्रसारणाचे काम मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे त्यांना मानवाचा मित्र समजले जाते. डिसेंबरमध्ये आलेल्या या पक्ष्यांचा मुक्काम एप्रिलपर्यंत असतो, असे स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्थेचे पक्षी निरीक्षक रामकृष्ण येकाळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhoradya bird Captivating exercises in ujani dam