भोसे जिल्हा परिषद गटात चुरस वाढली.

भोसे जिल्हा परिषद गटात चुरस वाढली.

Published on

BHO26B01368
प्रफुल्लता पाटील
---
BHO26B01366
डॉ. मृदुला तळेकर
---
BHO26B01367
स्मिता तळेकर
---
BHO26B01370
षण्मुखी कोरके
---
महिला आरक्षणामुळे भोसे जि.प. गटात चुरस
राजूबापू पाटलांच्या निधनानंतर अनेक स्थित्यंतरे; परिचारक वर्चस्वाला आव्हान
सुनील कोरके : सकाळ वृत्तसेवा.
भोसे (क), ता. १६ : सन २००२ साली निर्माण झालेल्या भोसे जिल्हा परिषद गटावर आतापर्यंत कै. यशवंतभाऊ पाटील, कै. राजूबापू पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. हा गट दुसऱ्यांदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या गटात मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे.
राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी विठ्ठल परिवारात फूट पडली. या फुटीचा फायदा आमदार अभिजित पाटील यांना झाला. पर्यायाने ते ‘विठ्ठल’चे चेअरमन व माढा विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी परिचारक यांच्या एकहाती सत्तेला आव्हान देण्यासाठी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचे ठरले; तशा बैठकाही पार पडल्या. परंतु, काही राजकीय घडामोडींनंतर अभिजित पाटील यांनी परिवारामधून काडीमोड घेत स्वतंत्र पॅनेल उभा करून परिवारालाच एकप्रकारे ‘खो’ दिला.
सध्याही परिवार एकत्र येणार, अशा चर्चा होत असल्या तरी ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी जिवाचे रान केले, त्यांच्या संधीचे काय? त्यांचे सांत्वन कसे करणार? हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. तालुक्यात बहुतांश सहकारी संस्थांवर परिचारकांचे वर्चस्व असल्याने या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
स्व. राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी विद्यमान पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील यांनाच पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच अॅड. गणेश पाटील यांनी कंबर कसली आहे. तसेच षण्मुखी भारत कोरके या अभिजित पाटील यांच्या गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अभिजित पाटील यांचे खंदे समर्थक प्रा. महादेव तळेकर हे सौभाग्यवती स्मिता तळेकर यांना संधी देण्याची मागणी करत आहेत. तर डॉ. मृदुला तळेकर यांनी रखुमाई फाउंडेशन व महिला बचत गटाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली आहे, त्यामुळे त्याही प्रबळ दावेदार आहेत. तसेच पूजा सोमनाथ सरडे याही परिचारक गटाकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर गुरसाळे येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामचंद्र गायकवाड हे आपली पत्नी सुवर्णा गायकवाड यांना रिंगणात उतरवून नशीब आजमावणार आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती गण हा इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने ओबीसी वर्गातील इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. असे असले तरी कोणता नेता कोणाबरोबर युती करणार, यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत.
---
भोसे जि.प. गट अन्‌ गुरसाळे पं.स. गण
- भोसे गणात येणारी गावे : भोसे, नेमतवाडी, शेवते, खेडभोसे, होळे, सुगाव-भोसे, सुगाव खुर्द.
- गुरसाळे गणात येणारी गावे : अजोती, चिलाईवाडी, गुरसाळे, आढीव, शेगाव दुमाला, भटुंबरे.
---
भोसे गटातील आतापर्यंतचे सदस्य
कै. राजूबापू पाटील (२००२ ते २००७), प्रफुल्लता पाटील (२००७ ते २०१२), बाळासाहेब माळी (२०१२ ते २०१७), अतुल खरात (२०१७ ते आतापर्यंत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com