Pune News : विठ्ठलवाडी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते पाणी योजनाचे भूमिपूजन

तरुणांनी रोजगार निर्मिती प्रकल्पावर भर देऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.
Bhumi Poojan of Water Scheme Guardian Minister Vitthalwadi talegaon dhamdhere
Bhumi Poojan of Water Scheme Guardian Minister Vitthalwadi talegaon dhamdheresakal

तळेगाव ढमढेरे : महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागू नये म्हणून मोदी सरकारने जल जीवन मिशन योजना अमलात आणली असून, याद्वारे प्रत्येक घरात नळातून पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. तरुणांनी रोजगार निर्मिती प्रकल्पावर भर देऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.

केंद्र सरकारतर्फे लवकरच वस्त्रोद्योग धोरण राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून देशासाठी विविध योजना व सुधारणा केल्यामुळेच येत्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा जनता पंतप्रधान मोदी यांनाच प्राधान्य देतील असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे पाणी योजनेचे भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार होते."शिरूर तालुक्यातील विविध गावात एकूण २० पाणी योजना सुरू केल्या असून त्यासाठी सुमारे ३२९ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. पाणी योजनांचे प्रतिनिधिक भूमिपूजन विठ्ठलवाडीच्या पाणी योजनेने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले"

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गावच्या पाणी योजना पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. ठेकेदारांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, कामाचा दर्जा उच्च ठेवावा, हलगर्जीपणा केल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. विठ्ठलवाडीची महत्वकांक्षी पाणी योजना असून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.

"यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीतर्फे तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भरघोस निधी दिल्याने शिरूर हवेली मतदारसंघात अनेक कामे मार्गी लागली आहेत. वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी भरघोस निधी दिला आहे. तसेच पाणी योजनांसाठी ही भरपूर निधी मिळाला आहे. विकासामुळे शिरूर हवेली मतदारसंघाचे स्वरूप बदलणार आहे. सर्व राजकीय गट तट विसरून विकास कामांसाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले."

दौंड, शिरूर व हवेली या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या विठ्ठलवाडी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी तसेच येथील बंधाऱ्यावर नवीन पूल बांधावा अशी आग्रही मागणी आमदार अशोक पवार व ग्रामस्थांनी केली.

या मागणीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्वरित दखल घेऊन येथील बंधाऱ्याची दुरुस्ती व पुलाच्या कामाचा प्रस्ताव त्वरित द्यावा, लवकरात लवकर मंजुरी देतो असे आश्वासन त्यांनी दिले. अनेक वर्षाचा हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसताच उपस्थित ग्रामस्थांनी चंद्रकांत पाटील यांना टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली".

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सरपंच कांतीलाल गवारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक संभाजी गवारे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. "दरम्यान, यावेळी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयश शिंदे यांच्यातर्फे ग्रामस्थांना अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली."

यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा बांदल, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, भाजपचे उपाध्यक्ष संदीप ढमढेरे व श्रीकांत सातपुते, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, माजी अध्यक्ष अनिल नवले, ऍड. सुधीर ढमढेरे, सरपंच शंकर धुळे, उपसरपंच संतोष गायकवाड,

खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष काळूराम गवारे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सोपानराव गवारे, शिवसेना नेते बापूसाहेब शिंदे, अनिल काशीद, हिरामण गवारे, बाळासाहेब गवारे, दिलीप गवारे, किसन गवारे, संतोष गवारे, ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच तसेच भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "प्रास्ताविक बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारे यांनी केले. सूत्रसंचालन रघुनंदन गवारे यांनी केले. जिल्हा भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com