तहसील कार्यालयाचे भूमिपूजन आमदारांनी चोरून केले - राष्ट्रवादी कॉंग्रसचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

मुळशी तहसील कार्यालाचे भुमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांनी श्रेय घेण्यासाठी परस्पर चोरून केले आहे असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.

तहसील कार्यालयाचे भूमिपूजन आमदारांनी चोरून केले - राष्ट्रवादी कॉंग्रसचा आरोप

भुकूम - मुळशी तहसील कार्यालाचे भुमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांनी श्रेय घेण्यासाठी परस्पर चोरून केले आहे असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे. याबाबत आमदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान निधी मंजूर करण्यात आपलाच पुढाकार आहे असा दावा थोपटे यांनी केला आहे.

पौड येथे शुक्रवार दिनांक 29 रोजी आमदार थोपटे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाचे भुमिपूजन करण्यात आले. इमारतीसाठी राज्य शासनाकडून पंधरा कोटी रूपये मंजुर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले आमदारांनी तालुक्याला अंधारात ठेवून भुमिपूजन केले. तालुक्यात कोणालाही कळविले नाही. तहसील हे तालुक्याचे कार्यालय आहे. कार्यालयासाठी तत्कालीन पालकमंत्री अजत पवार यांनी निधी मिळवून दिला आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केले आहे. राज्यात दोन्ही पक्ष एकत्र आहेत. दोन्ही पक्ष मिळून कार्यक्रम होणे गरजचे होते. या कार्यक्रमा बाबत त्यांनी कोणालाही कळविले नाही.

थोपटे यांनी तालुक्यातील आधिकारी यांची समन्वय बैठक घेत असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान त्याचवेळी चोरून भुमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. याचा पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त करत असल्याचे कोंढरे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा बँकेचे उपअध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, थोपटेंना निवडणूकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मोठे मतदान मिळाले हे त्यांनी विसरू नये. दर तीन महिन्याला दोन्ही पक्षांची समन्वय सभा घेऊ असे त्यांनी जाहीर केले होते. एकदाही त्यांनी समन्वय सभा घेतली नाही. कोणतीही कार्यक्रम एकत्र घेत नाही. या कार्यक्रमास तसेच शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सचिन खैरे म्हणाले हा आघाडी सरकारचा निधी आहे. तालुक्यात आघाडीतील पक्षांना एकत्र बोलवून मोठा कार्यक्रम घ्यावयास पाहिजे होता. दरम्यान याबाबत आमदार थोपटे म्हणाले, निधी मंजूर करण्यासाठी मी स्वता प्रयत्न केले आहेत. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निधी मंजूर केला आहे. तहसील कार्यालयाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.

मी फक्त औपचारिक भूमिपूजन केले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसही अनेक कार्यक्रम एकतर्फीच करत असते असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे म्हणाले आमदारांनी पाठपूरावा केल्याची पत्र आमच्याकडे आहेत, तसे पुरावे राष्ट्रवादीने तालुक्याला दाखवावेत.

टॅग्स :puneNCPMLABhumipujan