
Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तरुणांना कोयता पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शहरात पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: Pune Crime News: पुणे कॅम्प परिसरात कोयता गँगची दहशत, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान कोयता गॅंगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या युनिट १ शाखेची ही मोठी कारवाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन राजगारा हा व्यक्ती कोयते पुरवायचा याचे दुकान रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये आहे.

pune crime
हेही वाचा: Pune Crime News: पुण्यात कोयता गॅंगची निघाली धिंड! पोलिसांनी घडवली अद्दल, व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेश मधून तो कोयते मागवयचा. पोलिसांच्या तपासात रजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असलेलं निदर्शनास आले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर त्याच्या दुकानातून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.
तर कोयता गॅंग घटनेतील अनेक आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार पुण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.