Pune Crime News: पुणे कॅम्प परिसरात कोयता गँगची दहशत, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime News

Pune Crime News: पुणे कॅम्प परिसरात कोयता गँगची दहशत, व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शहरात पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: Bacchu Kadu: शिंदे-फडणवीसांवर बच्चू कडू नाराज! घेतला मोठा निर्णय, आता लढणार...

दरम्यान, पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील पुन्हा एकदा तरुणांकडून हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे कृत्य केले आहे. हा धक्कादायक प्रकार सी.सी. टिव्हीमध्ये कैद झाला आहे. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली आहे. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच तरून हॉटेलच्या समोर बसले असताना हॉटेल मालकाने येथे बसू नका असे सांगितले, आणि त्यांना हटकलं. याच गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन कोयत्याने तोडफोड केली तसेच हॉटेल मालकाला देखील धमकवले.

या घटनेतील चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार पुण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

हेही वाचा-द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

टॅग्स :Pune Newspolicepune