Bypoll Election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश Big blow to BJP on time of Chinchwad bypoll election Former corporator Tushar Kamthe joins NCP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bypoll Election

Bypoll Election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून राज्यसह पुण्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. गतवर्षी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु झालेले पक्षातील इनकमिंग आणि आउटगोइंग निवडणूक लांबल्याने काहीसे थांबले असल्याचे दिसून येत होते. दरम्यान पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडकीत पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु झाले असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी (१५ फेब्रुवारी) रोजी भाजला रामराम ठोकलेले चिंचवडचे माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज संध्याकाळी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वर्षभरापूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेल्या कामठेंनी बुधवारी (१५ फेब्रुवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना तुषार कामठे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तर,आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने या पक्षाची बाजू या निवडणुकीत काहीशी मजबूत झाली असल्याचे दिसून येत आहे.

२०१७ ला पिंपळे निलखमधून निवडून आलेले तुषार कामठे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर खूपच नाराज होते.त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढाईत साथ दिल्याने कामठेंनी प्रथम नगरसेवकपदाचा राजीनामा वर्षापूर्वी दिला.पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला,हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. तर आता त्यांनी थेट पक्षालाच सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आता राष्ट्रवादीतील प्रवेशाचे आमंत्रण आपल्या प्रभागातील मतदारांना देताना त्यांनी मतदारांना आर्त साद घातली आहे. आतापर्यंत तुम्ही जशी खंबीर साथ दिलीत, तशीच पुढील वाटचालीतही द्याल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. तुमच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही, याची ग्वाही देतो,असे सांगत त्यांनी पक्ष प्रवेशाला हजर राहण्याची विनंती पिंपळे निलखकरांना केली आहे.