MNS Pune: मनसेला खिंडार! एकाच वेळी 400 कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही ठोकणार पक्षाला रामराम?

निलेश माझिरेंची माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर घेतला निर्णय
MNS Pune
MNS PuneEsakal

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. तर राज्यभर दौरे करत आहेत. अशातच पुण्यातून मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना मनसेला पुण्यात मोठं खिंडार पडल्याच दिसून येत आहे. मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निलेश माझिरे आणि 400 पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह इतर 400 कार्यकर्त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. तर गेल्याच आठवड्यामध्ये मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वी माझिरे यांची पक्षातून केलेली हकालपट्टी आणि त्यांचा राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकल्यामुळे पुण्यात मनसे महानगरपालिकेत टिकू शकेल का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. एकीकडे राज ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आणि राज्यभर दौरे करत असतानाच, दुसरीकडे मोठं खिंडार पडल्यामुळे मनसेत नाराजी, पक्षांतर्गत खदखद सुरू असल्याचे दिसून येते आहे.

हे ही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

वसंत मोरेही ठोकणार मनसेला रामराम?

एका विवाह सोहळ्यामध्ये वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी अजित पवार- वसंत मोरे यांची भेट झाली आहे. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता... वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ वाढु शकते. वसंच मोरे पुण्यातील मनसेचा चेहरा आहेत. त्यामुळे वसंत मोरे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे. पक्ष सोडणार नाही अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.

MNS Pune
Vasant More: अरे किती नाराज तात्या; अजित पवारांच्या ऑफरवर वसंत मोरे म्हणाले...

वसंत मोरे नाराज?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भुमिका वसंत मोरे यांना रुचली नाही. त्यानंतर मोरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं मत बोलून दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं होतं.

MNS Pune
Ajit Pawar: 'तात्या कधी येताय...वाट पाहतोय', नाराज वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com