
पिंपरी : शहरातील घाऊक आणि किरकोळ औषधे विक्रेत्यांची दुकाने मंगळवार (ता. २८) पासून पूर्वीच्या वेळेनुसार चालू राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोरोना विरोधातील लढ्याला साथ म्हणून शहरातील घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांनी २७ एप्रिलपर्यंत दुकाने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मंगळवार (ता. २७) पासून दुकाने पूर्वीच्या वेळेनुसार उघडी राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड घाऊक औषधे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संतोष खिंवसरा म्हणाले, "चिंचवड स्टेशन येथील औषधांची घाऊक बाजार पेठ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहील. तर, किरकोळ औषधांची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आमची अत्यावश्यक सेवा चालूच आहे. अत्यावश्यक रूग्णांना घरपोच औषधे यापुढेही दिली जातील. आॅनलाईन औषधांसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक राहणार असून त्याशिवाय, औषधे मिळणार नाहीत." पिंपरी-चिंचवडमध्ये घाऊक औषधे विक्रेत्यांची संख्या ४०० तर किरकोळ विक्रेत्यांची संख्या सुमारे १६०० इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.