आळंदी, पंढरपूरमधील कार्तिकी वारीबाबत नाना पटोले म्हणतात...

विलास काटे
Thursday, 19 November 2020

वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यासाठी वारक-यांशी समन्वय साधून एसटी उपलब्ध केली जाईल. तसेच नदीपात्रात पाणी मुबलक सोडण्याची कार्यवाही केली जाईल. 

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि आळंदीतील कार्तिकी वारी किमान वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. परिणामी (ता. ८ डिसेंबरपासून) आळंदीत सुरू होणाऱ्या कार्तिकी वारीसाठी मंदिर प्रवेशासाठी वारकऱ्यांची निश्चित संख्या आणि आळंदीत प्रवेश किती दिंड्यांना राहिल याबाबतची उत्कंठा वारकऱ्यांना लागली आहे.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (ता. ८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे.  ८ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत यात्रा असून, वारक-यांचा मुक्काम दरवर्षी या काळात असतो.

दरम्यान, यंदा कोरोनामुळे आषाढी वारी अवघ्या पन्नास लोकांमध्ये केली गेली. आळंदीतून पंढरीकडे माऊलींच्या पादुका एसटीने नेण्यात आल्या. आता लॉकडाउनचे नियम शिथिल झाले आणि मंदिराचे दरवाजेही उघडले. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती आहे. यामुळे सरकारने प्रादुर्भाव टाळण्यासाठी मर्यादित स्वरूपात कार्तिकी वारी भरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुंबईतील विधानभवन येथे वारी दरम्यान येणा-या समस्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन या बाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि वारकरी यांच्यात बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर आणि आळंदीतील कार्तिकी वारी किमान वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.

वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यासाठी वारक-यांशी समन्वय साधून एसटी उपलब्ध केली जाईल. तसेच नदीपात्रात पाणी मुबलक सोडण्याची कार्यवाही केली जाईल असेही सांगितले. यामुळे मर्यादित स्वरूपातच वारी पार पडणार हे निश्चित असून, शासनाच्या आदेश अद्याप देवस्थान आणि स्थानिक प्रशासनाला आले नाहीत.

वारी भरणार नसल्याने यंदाच्या वर्षी वारी काळातील दुकाने, हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. एसटी महामंडळालाही तोटा सहन करावा लागेल. आषाढी प्रमाणेच लाखो वारक-यांची कार्तिकी वारी चुकणार असून, घरात बसूनच नामस्मरण करावे लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदीत राज्यातून तसेच परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणा येतााात. साडेतिनशेहून अधिक दिंड्या पायी येतात. यामुळे दिंड्याबाबत शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डाॅ. अभय टिळक म्हणाले, ''आळंदीतील वारीसाठी आठवडाभर वारकरी मुक्कामी असतात. मंदिराच्या आत देवस्थान देवाची पुजा, उपचार, परंपरा, जागर, फडकर्‍यांच्या सेवांना प्राधान्य देत अष्टमी ते अमावस्यापर्यंत शासनाच्या निर्देशानुसार पार पडेल. आळंदी यात्रेबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वारीतील दैनंदीन नित्योपचार होतील. वारकरी संख्येबाबत अद्याप निर्णय देवस्थानपर्यंत आला नाही.''

(संपादन : सागर डी. शेलार)

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big decision was made about Kartiki Wari