संत सोपान महाराज पालखी सोहळ्याबाबत मोठी मागणी 

दत्ता भोंगळे 
शुक्रवार, 22 मे 2020

संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन व स्वरूप कसे असावे, याबाबत संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त ऍड. गोपाळ गोसावी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

une-news">पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन व स्वरूप कसे असावे, याबाबत संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त ऍड. गोपाळ गोसावी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. याबाबत अंतिम निर्णय 29 मे रोजीच्या बैठकीत होईल, अशी माहिती सोपानदेव पालखी सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी दिली. 

घुंगरू तुटले रे..पोटासाठी नाचणाऱ्यांच्या नशिबी उपासमार... 

या निवेदनात म्हटले आहे की, सोहळ्यातील उपस्थितांची संख्या 20 असावी व यात प्रमुख मानकरी, दिंडी प्रमुख सेवेकरी, चोपदार याचा समावेश असावा. ज्येष्ठ वद्य द्वादशी (18 जून) रोजी सासवड येथून आषाढ वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवावे. परंतु, पायी प्रवास टाळण्याचे उद्देशाने देवाच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीपर्यंत सासवड येथील मंदिरातच ठेवाव्यात आषाढ शुद्ध दशमीला 30 जून रोजी दुपारी 12 वाजता सासवड येथून चार चाकी वाहनाने पंढरपूरकडे प्रस्थान होईल. या प्रवासासाठी राज्य सरकारने बस सेवा उपलब्ध करून द्यावी. पंढरपूर येथे चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, गोपाळपूर येथील काल्याचा प्रसाद, श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणे, असे कार्यक्रम एकादशी ते पौर्णिमा, या काळात स्थानिक प्रशासनाच्या पूर्व परवानगीने होतील. 

कोरोनाच्या लढाईत दौंडसाठी हा अहवाल ठरलाय... 

हा सोहळा दरवर्षी एक महिना चालतो. यंदा 30 जून ते 5 जुलै या कालावधीत तो पूर्ण होईल. सोपानदेव पालखी सोहळ्याची परंपरा राखली जाईल व सद्यपरिस्थितीतून मार्गही काढला जाईल. त्यासाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. सरकारच्या सर्व नियमांचा व सूचनांचा आदर करून पालखी सोहळा संपन्न केला जाईल, अशी ग्वाही देवस्थानने सरकारला दिलेली आहे. या नियोजनाबाबत ऍड. गोपाळ गोसावी यांनी पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंडी मालक, मानकरी, वारकरी व सेवेकरी यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big demand for Sant Sopan Maharaj Palkhi ceremony