पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धुमाकूळ

corona
corona
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. खेडमध्ये उच्चांकी 99 रुग्णांची भर पडली आहे. मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला असून आज तालुक्यात नवीन 12 रुग्ण सापडले आहेत. जुन्नरला 51 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू झाला आहे. आंबेगावात दिवसात 43 पॉझिटिव्ह सापडले आहेत.  

खेडमध्ये उच्चांकी 99 रुग्णांची भर
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला पहावयास मिळत असून आज उच्चांकी अशा 99 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, एकूण संख्या 2821 झाली आहे. आज तीन कोरोनाबधित दगावल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. तालुक्यात आळंदी येथील 77 वर्ष वयाच्या ज्येष्ठाचे, वाजवणे येथील 76 वर्ष वयाच्या ज्येष्ठाचे आणि राजगुरूनगर येथील 57 वर्ष वयाच्या महिलेचे निधन झाले. आज चाकणला 12, राजगुरूनगरला 18 आणि आळंदीत 14 कोरोनाबधित रूग्ण आढळले, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 55 रुग्ण सापडले. वडगाव घेणंदला 8, खराबवाडीत 7 आणि मांजरेवाडीत 4 रुग्ण सापडले. काळूस, निघोजे, मेदनकरवाडी, मरकळ आणि वाकी बुद्रुक येथे प्रत्येकी 3 रुग्ण; तर अहिरे, कुरूळी, मोई आणि वासुली येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. चिंबळी, दोंदे गुळाणी, होलेवाडी, काळेचीवाडी, केळगाव, शेलगाव, शेलपिंपळगाव, राक्षेवाडी, रासे, रेटवडी सातकरस्थळ आणि वाजवणे यांठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. 

मुळशीत हजाराचा आकडा पार
पिरंगुट  :
मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला असून आज तालुक्यात नवीन 12 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 1048 झाली आहे. तालुक्यात आज हिंजवडी , बावधन , नेरे व भूगाव येथे प्रत्येकी 2, तर मुलखेड, जांबे, लवळे व मारुंजी येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तालुक्यात आज मारुंजी येथील 1 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 31 झाली आहे. 

जुन्नरला 51 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू 
जुन्नर :
कोरोना संसर्ग झालेल्या राजुरी व गोळेगाव येथील दोघांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या 40 झाली आहे. तालुक्यात आज गुरुवार ता.27 रोजी शिरोली बुद्रुक-6, बेल्हे-6, वडज-5, आळेफाटा-5, धोलवड, ओतूर,येडगाव व जुन्नर शहर प्रत्येकी -3, खिलारवाडी, राजुरी, नारायणगाव प्रत्येकी-2, गुंजाळवाडी, शिरोली खुर्द, माणिकडोह, डिंगोरे, वडगाव कांदळी, वारुळवाडी,काले,वडगाव आनंद, येणेरे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव,आळे येथे प्रत्येकी एक असे एकूण 51 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 912 झाली असून यापैकी 593 बरे झाले आहेत तर 279 जण विविध ठिकाणी उपचार घेत असून 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आंबेगावात दिवसात 43 पॉझिटिव्ह 
मंचर :
आंबेगाव तालुक्‍यात गुरुवारी 43 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुक्‍यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 942 झाली आहे. मंचर शहरात सर्वाधिक 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. निरगुडसर चार, नारोडी तीन, लोणी, घोडेगाव, चांडोली बुद्रुक, कळंब, पिंपळगाव खडकी, नांदूर येथे प्रत्येकी दोन, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, वडगाव काशिंबेग,शेवाळवाडी, खडकी शिनोली, निघोटवाडी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून 431 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दौंड तालुक्‍यात 38 जणांना बाधा 
दौंड : दौंड तालुक्‍यात 19 महिलांसह एकूण 38 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. दौंड शहरासह कुरकुंभ, गिरीम, देऊळगाव राजे, आलेगाव, कुसेगाव, वरवंड, यवत, बोरीपार्धी, भांडगाव, बोरीभडक, पाटस, पडवी येथे एकूण 38 जणांना बाधा झाली आहे. बाधितांचे वयोमान अडीच वर्षापासून 72 वर्ष दरम्यान आहे. 

पुरंदरच्या पूर्व भागात मुसंडी 
माळशिरस :
पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये आज कोरोनाने मुसंडी मारत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले. पूर्व भागातील मोठे गाव असणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या पिसर्वे गावात परत एकदा कोरोाने शिरकाव केला, तर नायगाव येथे पहिल्या एक रूग्णानंतर आणखी नव्याने दोन रुग्ण सापडले. गुरोळी येथे देखील नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला.  नायगाव, पिसर्वे गाव पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com