esakal | पावसाच्या पाण्यामुळे दिवाळीच्या तोंडावर व्यापारी अडचणीत; इंदापुरात मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाच्या पाण्यामुळे दिवाळीच्या तोंडावर व्यापारी अडचणीत; इंदापुरात मोठे नुकसान

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झाल्याने संकटातून उभारी घेत असताना पावसाच्या व पुराच्या पाण्याने  इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील दुकानदारांचे  अतोनात नुकसान झाले आहे.

पावसाच्या पाण्यामुळे दिवाळीच्या तोंडावर व्यापारी अडचणीत; इंदापुरात मोठे नुकसान

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झाल्याने संकटातून उभारी घेत असताना पावसाच्या व पुराच्या पाण्याने  इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील दुकानदारांचे  अतोनात नुकसान झाले असून  दिवाळीच्या  तोंडावर व्यापारी वर्ग अडचणीमध्ये आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे बाजारपेठ बंद झाल्यामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. दुकानदारांची आर्थीक गणिते बिघडली. कोरोनाच्या संकटातून सावरुन व्यापाऱ्यांची दुकाने नियमित सुरु झाली होती. व्यापाऱ्यांनी दिवाळीची तयारी सुरु केली होती. बहुतांश दुकानदारांनी दिवाळीसाठीचा मालाची खरेदी केली. मात्र बुधवार (ता. १४) ची सायंकाळ इंदापूर तालुक्यातील व्यापारी वर्गासाठी धोकादायक ठरली. दीड तासाच्या पावसाने तालुक्यामध्ये हाहाकार माजला.

तालुक्यातील रस्त्यावरुन दीड ते दाेन फुट पाणी वाहत होते. पावसाचे पाणी तसेच ओढ्याच्या पुराचे पाणी रस्त्यालगतच्या दुकानामध्ये घुसल्याने दुकानदारांचा कोट्यवधी रुपयांचा माल पाण्यात बुडून खराब झाला. खोलगट असणाऱ्या दुकानामध्ये पाच ते सहा फुट पाणी साचले होते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनेक रस्त्यालगची पत्र्याच्या शेडमधील दुकाने वाहून गेली आहेत. आज बहुतांश दुकानदाराचे दुकानांमध्ये पाणी व चिखल साचलेला आहे. छोट्या दुकानदारापुढे दिवाळीसाठीचा माल खरेदी कसा करावयाचा हा प्रश्‍न उभा राहिला आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सणसर, लासुर्णे, अंथुर्णे परीसरातील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान...
यासंदर्भात लासुर्णेमधील लक्ष्मी क्लाॅथ सेंटर मालक राजू जामदार यांनी सांगितले की, दिवाळी सण डोळ्यासमोर ठेवून दिवाळीपूर्वी कपड्याची खरेदी केली होती. बुधवार (ता.१४) रोजी पावसाचे पाणी दुकानांच्या गोडावूनमध्ये घुसल्याने सुमारे शर्ट, पॅन्ट, साड्या व इतर कपडे खराब झाली असून, पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image