खेड-शिवापूर टोलनाक्याच्या बनावट पावत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी

खेड-शिवापूर टोलनाक्याच्या बनावट पावत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी

खेड-शिवापूर : "येथील टोलनाक्यावर उघडकीस आलेल्या बनावट पावत्या प्रकरणाच्या तपासासाठी बारामती विभागाचे उपअधीक्षक यांची स्वतंत्र तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे," अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

खेड-शिवापूर टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी बनावट पावत्यांचा घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली. खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे कायदेविषयक सल्लागार ऍड. नितीन दसवडकर, निमंत्रक माऊली दारवटकर, कृती समितीचे पद्माकर कांबळे, सतीश हंचाटे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बनावट पावत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना करून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची जबाबदारी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी बारामती विभागाचे उपअधिक्षक यांची या प्रकरणी स्वतंत्र तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले आहे, अशी माहिती खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com