

Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
sakal
पुणे: घोले रस्त्यावरील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी प्रतिमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानात २१५० रुपयांवरून ३२०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आज (ता. ३०) सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही रक्कम थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा होणार आहे.