esakal | पुणे : भवानी पेठेत भाजी खरेदीसाठी उडाली झुंबड; 'सोशल डिस्टन्सिंग'ला फासला हरताळ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaji-Mandai

कांदा, बटाटा, फ्लॉवर, टोमॅटोसारख्या मालाला जास्त मागणी आहे. त्यामुळे हा माल सहजपणे विक्री होतो. ​

पुणे : भवानी पेठेत भाजी खरेदीसाठी उडाली झुंबड; 'सोशल डिस्टन्सिंग'ला फासला हरताळ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : पुणे शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळून आले आहे. त्याच परिसरात शनिवारी (ता.११) मोठ्या प्रमाणात भाजी घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडालेली दिसली. याची प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भवानी पेठ परिसरात शनिवारी कुमार गॅलॅक्सी सोसायटीच्या समोर रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्रीचा नव्याने व्यवसाय सुरु केला आहे. पूर्वी या चौकात एकाही भाजीच्या हातगाडीस थांबण्यास परवानगी नव्हती. कॅम्प येथील शिवाजी मार्केट आणि कुंभार बावडी येथील असणारे मार्केट बंद करून गोळीबार मैदानात भाजी मार्केटचे स्थलांतर करण्यात आले. तरी देखील विना परवानगी भवानी पेठ परिसरात भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जोरात सुरु ठेवला आहे. तोंडाला मास्क न बांधणे आणि सोशल डिस्टंसिंगचे कुठलेही नियम येथे पाळले जात नाहीत.

विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे परवाने दिलेले नाहीत. गुलटेकडी मार्केटयार्ड येथील भाजीपाला विभाग बंद असल्याने हे सर्व विक्रेते हडपसर आणि चंदननगर येथील होलसेल मार्केटमधून भाजीपाला विक्रीस आणत आहेत, अशी माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी राजेश खुडे यांनी दिली. पेठांमधील अनेक ठिकाणी भाजी मंडई बंद असल्याने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ठरवून दिलेल्या वेळेत भवानी पेठेतील बनकर तालीम, चमनशाह दर्गा या ठिकाणी सध्या भाजीची विक्री केली जात आहे.

- लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार मैदानात होणारी भाजी विक्री ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विक्रेते कुमार गॅलॅक्सी अजमेरा बिल्डिंग, चुडामण तालीम ते मुक्ती फोर्स या चौकापर्यंत भाजी विक्रेत्यांनी जागा व्यापल्याने प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत दोन्ही विभागाच्या हद्दी आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून गणेश पेठ व खडकमाळ आळीतील खेडेकर भाजी मार्केट विक्रीसाठी स्पॉट निश्चित करण्यात आले आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री येथे होणार आहे.

उत्तमनगर भागात भाजीपाला मुबलक  

शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे आणि कोंढवे-धावडे या भागात भाजीपाला मिळत आहे. त्यासाठी वेळ देखील पोलिसांनी वाढविली आहे. याच परिसरात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे. उत्तमनगर भाजी मंडईत सकाळच्या सुमारास भाजी विक्री केली जाते. तसेच शेतकरी टेम्पोतून भाजी, फळे आणि अंडी विक्रीसाठी घेऊन येत आहेत. तसेच काही ठिकाणे भाजीची दुकाने वेगवेगळ्या भागात असल्याने अद्याप तरी येथे काही अडचणी भासत नाहीत. रस्ते रिकामे असल्याने भाजी विक्रेते 10 फुटांवर बसतात. सामाजिक अंतर ठेवून खरेदी-विक्री होते.

- खासदार अमोल कोल्हेंमधील डॉक्टर झाला जागा ; व्हिडिओद्वारे कोरानाबाबत जनजागृती

खडकीत मुबलक, बोपोडीत मात्र ठणठणाट

खडकीच्या भाजी मंडईत मुबलक भाजी येत आहे. मात्र, मंडई खडकी बाजाराच्या बाहेर असल्यामुळे तेथे जाण्यासाठी नागरिकांना अडचण येत आहे. खडकी भाजी मंडईत दर व्यवस्थित होते. बोपोडीत मात्र भाजी विक्रेते अवाच्या सवा दर आकारत आहेत. मिरची २०० रुपये किलो दराने रेल्वे क्रॉसिंग जवळ विक्री केली जात आहे. बोपोडीत इतर भाजीवाले ही जास्त दराने भाजी विक्री करत होते. सोशल डिस्टनसिंगचा नियम हे भाजी विक्रेते पाळताना दिसत नाहीत.

खडकवासल्यातील नागरिकांनी जास्तीची भाजी भरली

गोऱ्हे, डोणजे, खानापूर, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला परिसरात स्थानिक भागातीलच शेतकरी आणि टेम्पोतून माल घेऊन येणारे विक्रेते यांच्यामुळे भाजी मिळत आहे. काही मोठ्या सोसायटीमध्ये कृषी विभागाने भाजी विक्रीची व्यवस्था केली आहे. ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारपासून या भागात पूर्णपणे सर्व भाग लॉकडाऊन केल्यामुळे येथे कोणतेच भाजी, फळ विक्रेते आले नाहीत. खडकवासला येथील भाजी मंडई पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी गुरुवारी जास्तीची भाजी भरली. 

- Lockdown : दिल्लीत यशस्वी ठरलं 'ऑपरेशन शिल्ड'; कोरोनाला रोखण्यात यश!

आंबेगावात भाजीपुरवठा सुरळीत

सध्यातरी सुरळीत असून भाजीपाला बारामती व वाई येथून विक्रीसाठी बाजारात आणला जात आहे. तसेच शेतकरी माल ही बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. कांदा, बटाटा, फ्लॉवर, टोमॅटोसारख्या मालाला जास्त मागणी आहे. त्यामुळे हा माल सहजपणे विक्री होतो, पण इतर काही भाज्या विक्री न झाल्याने व खराब झाल्याने फेकून द्यायची वेळ काही भाजी विक्रेत्यांवर येत आहे. काही भाज्यांचे दर थोडे वाढले आहे.

loading image