पुणे विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट: Pune Vidhan Sabha by election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Vidhan Sabha by election: पुणे विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट

Pune Vidhan Sabha by election: पुणे विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पोटनिवडणुक मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आली आहे.(Big update regarding Pune Vidhan Sabha by election Kasaba Peth chinchwad )

27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान पार पडणार आहे.

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

निवडणूक आयोगाने हा निर्णय बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता.

हेही वाचा: Ahmednagar Murder Mystry: आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे आहवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.

हेही वाचा: Sambhaji Brigade : कसबा विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढविणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या. निकालांच्या तारखांमध्ये कुठल्याही बदल नसल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.