Second Marriage Complaint
esakal
थेऊर : पहिल्या पत्नीशी वैवाहिक नाते कायदेशीररीत्या अस्तित्वात असताना पतीने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर दुसऱ्या महिलेशी दुसरे लग्न (Second Marriage Complaint) करून सहजीवन सुरू केले आणि सोशल मीडिया माध्यमांवर दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून दर्शवून फोटो, स्टेटस् व पोस्ट अपलोड करून मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दहा जणांवर फिर्याद दिल्यानंतर लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दुसरी पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळवून लढत देत आहे. (Wife Files FIR Against Husband Second Marriage)