Shirur Crime : दूचाकी चोरीला गेल्याचा ताप सहन करतानाचा ऑनलाईन दंडामुळे मनस्ताप

आठ महिन्यांपूर्वी कामाची गरज म्हणून त्यांनी दूचाकी घेतली, पण घरासमोरील पार्किंग मध्ये ती लावली असताना रात्रीच्या वेळी चोरीला गेली.
rto online fine
rto online finesakal
Updated on

शिरूर - आठ महिन्यांपूर्वी कामाची गरज म्हणून त्यांनी दूचाकी घेतली, पण घरासमोरील पार्किंग मध्ये ती लावली असताना रात्रीच्या वेळी चोरीला गेली. फिर्याद नोंदवून तळमळीने त्यांनी तपासाविषयी पोलिसांकडे पाठपुरावा केला.

गाडीचा तपास तर लागला नाहीच; पण याच गाडीवर गेल्या २२ दिवसांत छत्रपती संभाजीनगर परिसरात दोन वेळा ऑनलाईन दंड पडला आणि तो भरण्याबाबत मात्र पोलिसांचा संदेश संपर्क सुरू झाला. त्यामुळे 'भिक नको, पण कुत्रे आवर' असे म्हणण्याची वेळ दूचाकी गमावलेल्यावर आली आहे.

येथील आकाश मधुकर चाकणे या सामान्य कुटूंबातील तरूण व्यावसायिकाने व्यवसायाची गरज म्हणून आठ महिन्यांपूर्वी नवी कोरी दूचाकी विकत घेतली. मात्र, १६ मार्च ला गुजर मळा येथील घरासमोरील पार्कींग मधून रात्रीच्या वेळी ती चोरीला गेली.

आसपास शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी याबाबत शिरूर पोलिसांकडे आपली दूचाकी (क्र. एमएच १२ डब्ल्यूडब्ल्यू २३३८) चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली. दरम्यान, नवी दूचाकी चोरीला गेल्याने त्यांनी पोलिसांकडे तपासाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र 'तपास चालू आहे, तुम्हीदेखील तुमच्या पद्धतीने शोधात रहा', असे ठोकळेबाज उत्तर त्यांना मिळाले.

दरम्यान, नो पार्किंग मध्ये दूचाकी उभी केल्याबद्दल चाकने यांना दंडाचे चलन ऑनलाईन आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत माहिती दिल्यावर पार्किंग स्थळ संभाजीनगर परिसरातील असल्याने शोध घेऊ, असे उत्तर पोलिसांकडून दिले गेले.

या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच आज (ता. ७) पुन्हा त्यांच्या गाडीवर ऑनलाईन दंड पडला आणि त्याचे चलन व फोटो चाकणे यांना मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली.

हेल्मेट न घातल्याबद्दलचा हा दंड होता व फोटो मध्ये एक जोडपे गाडी घेऊन चालले असल्याचे दिसल्यावर त्यांनी घडलेली घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र दोन दिवसात तपास लावू, असे जुजबी उत्तर पोलिसांकडून दिले गेल्याने चाकणे यांना पुन्हा हात हलवित माघारी जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com