अबब ! दुचाकीस्वाराने भरला तब्बल 42 हजार 300 रुपयांचा दंड !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या एका नागरीकाच्या दुचाकीवर वाहतुक पोलिसांकडून तब्बल 42 हजार 300 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दुचाकीच्या किंमतीजवळ पोचणारा 42 हजार 300 रुपयांचा दंड अखेर संबंधीत दुचाकीस्वारने भरला.

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या एका नागरीकाच्या दुचाकीवर वाहतुक पोलिसांकडून तब्बल 42 हजार 300 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दुचाकीच्या किंमतीजवळ पोचणारा 42 हजार 300 रुपयांचा दंड अखेर संबंधीत दुचाकीस्वारने भरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतुक पोलिस व सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष्य ठेवले जात आहे. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधीत वाहनाचा मोबाईलवर फोटो काढून किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्या वाहनाचा फोटो घेऊन त्यास दंडाच्या रकमेचे ईचलन पाठविले जाते. त्यानुसार, त्या नागरीकाने ईचलन भरणे आवश्‍यक असते. मात्र सातत्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिदे व पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या आदेशानुसार "टॉप 100' वाहनचालकांची यादी तयार करण्यात आली. तसेच त्यांना दंडाच्या रकमेचे ईचलन पाठविण्यात आले होते. मात्र वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

दरम्यान, वाहतुक पोलिसांनी या "टॉप 100' वाहनचालकांची शोध मोहिम हाती घेतली. त्यानुसार, एमएच 12 एफजी 4678 या क्रमांकाच्या दुचाकीवर तब्बल 42 हजार 300 रुपये इतका दंड आकारला होता. त्यानेही आत्तापर्यंत दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर संबंधीत वाहनचालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास त्याच्या दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने 42 हजार 300 रुपये इतकी दंडाची रक्कम भरली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biker paid a fine of Rs 42300 in Pune