पुणे : बाजार समिती बंद असल्यामुळे आंबेगावमध्ये...

kanda.
kanda.
Updated on: 

मंचर : “कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याचा फटका शेतीमालाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मंचर येथे बाजार समिती एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे एकूण २५ कोटी रुपयांची होणारी शेती मालाची आर्थिक उलाढाल पूर्णपणे थांबली असून त्याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे.” अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

“आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंचर हे मुख्यालय आहे. येथे आंबेगाव प्रमाणे शिरूर, जुन्नर, खेड तालुक्यातील काही गावातून तरकारी, भाजीपाला, कांदा, बटाटा विक्रीसाठी येतो. येथील शेतीमाल प्रामुख्याने अडत्या मार्फत पुणे-मुंबई, सुरत व दक्षिण भारतामध्ये मालट्रक द्वारे पाठविला जातो. पण जवळपास सर्वच बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने तसेच वाहतूकही ही बंद आहे. उत्पादित शेतीमाल खरेदीसाठी खरीदार नसल्याने व मजुरी भागत नसल्याने नाईलाजास्तव भाजीपाला टोमॅटो व तरकारी मालात शेतकऱ्यांनी गुरे सोडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमान वाढत असल्याने कांदा सडून जात आहे. जुलै-ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच कांद्याची निर्यातही केंद्र सरकारने काही काळ थांबवली होती. या संकटातून शेतकरीवर्ग सावरत असतानाच कोरोनाचे महाभयंकर संकट आले. या संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पीक कर्जाचे हप्ते भरता येणार नाहीत. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.” असे निरगुडसर येथील प्रगत शेतकरी व उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांनी सांगितले. 

“मंचर बाजार समितीतून दररोज ७५ लाख रुपये किमतीचा तरकारी व भाजीपाला विक्रीसाठी नवी मुंबई, पुणे, कल्याण व परराज्यात पाठविला जात होता. पण तब्बल एक महिना बाजार समितीतील व्यवहारबंद आहेत. हमाल मापाडी यांचाही रोजगार बुडाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. उद्योग व्यवसाय या प्रमाणेच शेतकऱ्यांनाही राज्य शासनाने नुकसान भरपाईचे पॅकेज द्यावे.” अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com