esakal | लसीचा एकच डोस झाल्यास प्रवासादरम्यान चाचणीचे बंधन
sakal

बोलून बातमी शोधा

Covid vaccination

लसीचा एकच डोस झाल्यास प्रवासादरम्यान चाचणीचे बंधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील तर, त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, एकच डोस झाला असेल तर प्रवासापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे दोन डोस झाले नसतील, त्यांनी प्रवास करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची विमानतळ अथवा रेल्वे स्थानकावर आरटीपीसीआर चाचणी करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

हेही वाचा: पुणे : धरण परिसरात २४ तास संततधार पाऊस; वाढला सव्वा TMC पाणीसाठा

सध्या पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या लोहगाव विमानतळावर तेथील प्रशासनाकडून तर, रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून चाचण्या होत आहेत. रेल्वे स्थानकावर त्यासाठी महापालिकेची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी लसीचे दोन डोस घ्यावे आणि त्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे. अन्यथा त्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले. एकच डोस झाला असेल तर, आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

loading image