esakal | पुणे : धरण परिसरात २४ तास संततधार पाऊस; वाढला सव्वा TMC पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

 Increased one and half TMC water storage after 24 hours continuous rain in dam area Pune

पुणे : धरण परिसरात २४ तास संततधार पाऊस; वाढला सव्वा TMC पाणीसाठा

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : खडकवासला धरण साखळीत मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा या २४ तासात सुमारे सव्वा टीएमसी पाणी वाढले. सध्या चार ही धरण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.

मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या २४ तासात खडकवासला येथे १५, पानशेत येथे १२६, वरसगावला ११४, टेमघर येथे ६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

आज बुधवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणात १२.२४ टीएमसी म्हणजे ४१.९९ टक्के पाणी साठा जमा झालेला आहे. काल मंगळवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणात मिळून ११.०३ टीएमसी म्हणजे ३७.८३ टक्के पाणीसाठा होता. म्हणजे मागील २४ तासात १.२१ टीएमसी म्हणजे ४.१६ टक्के पाणीसाठा वाढला आहे. असे खडकवासला पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: कोयत्याचा गुन्हेगारांकडून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वापर

धरणातील येवा दुप्पट झाला

पावसाचे पाणी डोंगर दऱ्यात पडून ओढ्याने नदी मिळून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्याच्या प्रक्रियेला येवा म्हणतात.

पानशेत धरणात मंगळवारी संध्याकाळी २२९ क्यूसेक चा येवा होता. तो आज बुधवारी सकाळी ४५८ क्यूसेक झाला आहे. वरसगावमध्ये काल संध्याकाळी २०७ होता तो ४८४ क्यूसेक झाला आहे. टेमघर येथे ३५ होता आज तो ९१ झाला तर खडकवासला येथे ५७ चा १८१ क्युसेक झाला आहे.

दरम्यान, पानशेत धरणातून ५६० क्युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. तर खडकवासला धरणातून कालव्यात १०५४ क्युसेक पाणी खरीप हंगामासाठी सोडले जात आहे.

हेही वाचा: पिंपरी : महापालिका उभारणार १३ मजली इमारत

loading image