पक्षी महोत्सवाची पर्वणी शुक्रवारपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पक्ष्यांचा अधिवास, संरक्षण आणि संवर्धनासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्‌घाटन राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी ६ वाजता होईल.

पुणे - पक्ष्यांचा अधिवास, संरक्षण आणि संवर्धनासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्‌घाटन राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी ६ वाजता होईल. रविवारपर्यंत (ता.२) चालणाऱ्या या महोत्सवात माहितीपट आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महोत्सवाचे उद्‌घाटन वनविभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्‍चिम) सुनील लिमये यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पोलिस आयुक्त के. वेंकटेशम उपस्थित राहणार आहेत. वन्यजीव चित्रपटकार अजय बेदी आणि विजय बेदी यांच्या ‘द स्टॉर्क सेव्हियर्स’ करकोच्यांवरील वन्यजीव चित्रपटाने पक्षी महोत्सवाचा शुभारंभ होईल. यानंतर पक्षितज्ञ डॉ. सुरुची पांडे यांचे ‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील घुबड’ या विषयावर सादरीकरण होईल. 

पक्षी अभ्यासाची मुहूर्तमेढ भारतात रोवणारे आद्य पक्षीअभ्यासक डॉ. सालीम अली यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाने पक्षी महोत्सवाची सांगता होणार आहे. जीविधा ही संस्था महोत्सवाची सहआयोजक आहेत. या महोत्सवाला संजीवनी डेव्हलपर्स व जंगल बेल्स यांनी साह्य केले आहे. महोत्सवाला सामाजिक वने आणि पुणे वनविभाग (वन्यजीव) यांचे सहकार्य लाभलेले आहे. 

महोत्सवात...
    शनिवार (ता. १)
    सायंकाळी ४  पासून 
    व्याख्यान - ‘पक्ष्याचे उडण्याचे तंत्र’ 
(मंगेश दिघे) 
    माहितीपट - ‘रेझीलियन्स फिश इगल ऑफ नैवाशा’ (किरण घाडगे)
    व्याख्याने - कोकणातील पक्षिजगत (अक्षय खरे), जगभरातील पक्षिवैभव (विक्रम पोतदार) 

     रविवार (ता.२)
    सकाळी ६.३० - 
सिंहगड परिसरात पक्षी निरीक्षण सत्र
    सकाळी १० - कार्यशाळा - पक्ष्यांची ‘कृत्रिम घरटी’ (विश्वजित नाईक)  
    सायं. ४.३० - माहितीपट - ‘द फिफ्थ फ्लायवे’ 
(डॉ. संजीव नलावडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Festival

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: