
पुणे : अहमदाबाद विमान दुर्घटनेची जखम ताजी असतानाच शुक्रवारी पुणे विमानतळावर उतरणारे विमान अपघातातून थोडक्यात बचावले. दिल्लीहून पुण्याला येणारे एअर इंडियाच्या (एआय-२४६९) विमानाच्या उजव्या इंजिनला पक्ष्याची जोरदार धडक झाली. यात विमानाच्या इंजिनमधील ब्लेडचे पर्यायाने उजव्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. मात्र वैमानिकाने शिताफीने सुरक्षितपणे विमानाचे लँडिंग केल्याने सुमारे शंभर प्रवाशांचे प्राण बचावले.
विमान नादुरुस्त झाल्याने पुढची सेवा रद्द झाली. सुदैवाने विमानाचा अपघात न झाल्याने सर्व प्रवासी पुणे विमानतळावर सुखरूप उतरले. ही घटना पुणे विमानतळावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.