Crime
वेल्हे, (पुणे) - बारामती अग्रो लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या ८४५ देशी पक्ष्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली असून, वेल्हे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी डॉ. राकेश विलासराव तिडके (वय-४६ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी कंपनीच्या करारानुसार दिलेल्या पक्ष्यांना परत न करता परस्पर विक्री केली होती. ही घटना २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:२५ वाजता आस्कवडी (ता. राजगड, जि. पुणे) येथे घडली असून, पक्षी चेलाडी फाटा नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथे मिळून आले आहेत.