पक्षी अधिवासाचे आज उलगडणार रहस्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पक्षी महोत्सवाचा रविवारी (ता.२) शेवटचा दिवस असून, त्यात दोन माहितीपटांच्या सादरीकरणाबरोबर तज्ज्ञांची दृकश्राव्य माध्यमातून व्याख्याने होणार आहेत. सिंहगड व्हॅली येथे सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत पक्षीनिरीक्षण सत्र होतील. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - पक्षी महोत्सवाचा रविवारी (ता.२) शेवटचा दिवस असून, त्यात दोन माहितीपटांच्या सादरीकरणाबरोबर तज्ज्ञांची दृकश्राव्य माध्यमातून व्याख्याने होणार आहेत. सिंहगड व्हॅली येथे सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत पक्षीनिरीक्षण सत्र होतील. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज काय पाहाल?
पक्ष्यांची कृत्रिम घरटी कार्यशाळा - विश्वजित नाईक (सकाळी १०)
विविध कारणांस्तव घटत चाललेला पक्ष्यांचा अधिवास
पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवण्याचा अनोखा उपाय
विविध टाकावू वस्तूंपासून बनवलेली घरटी
पक्षी ही घरटी स्वीकारतात का, याचा नाईक यांनी केलेला अभ्यास.

पुणे तिथे बर्ड ॲटलास उणे! - डॉ. पंकज कोपर्डे (दुपारी १२ )
पुण्यातील पक्षीविविधता
विविध कारणांस्तव कमी होत चाललेला पक्ष्यांचा अधिवास
संवर्धन आणि संरक्षण यासाठी पुण्याच्या बर्ड ॲटलासची गरज 

बर्ड मायग्रेशन माहितीपट (सायं.५ )
स्थलांतर म्हणजे काय? आणि त्याचे प्रकार
स्थलांतर का केले जाते?
पक्षीजीवनातील अविभाज्य घटकाचा मागोवा घेणारा सुंदर माहितीपट

द फिफ्त फ्लायवे काउंटिंग मायग्रेटरी रिपोर्ट : डॉ. संजीव नलावडे
पक्षीगणना म्हणजे काय?
ती कशी केली जाते, त्यासाठीच्या पद्धती
स्थलांतर करणाऱ्या शिकारी पक्ष्यांची गणना कशी केली जाते? 

इन कंपनी ऑफ बर्ड (माहितीपट)
भारतात पक्षीनिरीक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा माहितीपट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird watching at Singhagad Festival