
पारगाव: जारकरवाडी ता. आंबेगाव येथे पारंपारिक पध्दतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त आयोजीत श्री. बिरोबा देवाच्या उत्सवानिमित्त हरिकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
७७ वर्षीय पुजारी गणपत येमना मंचरे यांनी कमरेला बांधलेल्या दोरीच्या साह्याने देवाच्या मानाच्या १२ बैलगाड्या ओढल्या. हा पारंपारिक कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते.