वाघोलीत नऊ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death in lake
वाघोलीत नऊ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू

वाघोलीत नऊ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू

वाघोली - वाघोली येथील भैरवनाथ मंदिर तलावात (Bhairavnath Lake) पाय घसरून पडल्याने एका नऊ वर्षीय मुलीचा (Girl) बुडून मृत्यू (Death) झाला. चार तासाच्या शोधकार्यानंतर तिचा मृतदेह हाती लागला.

हेही वाचा: पुणे : २० हजाराची लाच घेताना महावितरण अभियंता एसीबीच्या जाळ्यात

सोनाक्षी विजय राखपसरे (वय नऊ वर्षे, रा.वाघोली ) असे बुडालेल्या मुलीचे नाव आहे. ती आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपली मोठी बहिण सुनीता हिच्यासोबत भैरवनाथ मंदिर तलावावर कपडे धुण्यासाठी आली होती.मोठी बहिण कपडे धूवत असताना सोनाक्षी हि लघुशंकेसाठी बाजूला जात असताना तीचा पाय घसरुन ती तलावात पडली. यावेळी पडलेल्या लहान बहिणीला वाचवण्यासाठी मोठ्या बहिणीने घाबरून आरडाओरडा केला. परंतु,परिसरात आजुबाजुला बसलेले नागरिक व कपडे धुण्यासाठी असलेल्या महिला घाबरून पुढे गेल्या नाहीत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशमन विभागाचे उपस्थानक आधिकारी विजय महाजन, वाहन चालक संदीप शेळके, अक्षय बागल, मुस्ताक तडवी, चेतन खमसे, विकास पालवे,ओम पाटील,अभिजित दराडे, व सामाजिक कार्यकर्ते चेतन पाचरणे यांनी चार तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Nine Year Old Girl Died After Falling Into Bhairavnath Lake In Wagholi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathwagholiDeath girl
go to top