
पुणे : जन्म आणि मृत्यू या प्रत्येकाच्या जीवनातील दोन महत्त्वाच्या घटना आहेत. या दोन्ही घटनांची नोंद शासनदरबारी होणे बंधनकारक आहे. शहरी भागात ही नोंदणी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत किंवा छावणी मंडळात तर, ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. जन्म व मृत्यूची नोंदणी अनिवार्य असून ती करावी, असे आवाहन राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.