
पुणे - कुख्यात गजानन ऊर्फ गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना रस्त्यात झालेल्या मटण बिर्याणीच्या पार्टीवेळी त्याला पैशांसह विविध प्रकारची मदत करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला.